'हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?'

p chidambaram
p chidambaram

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरू केला. लॉकडाऊनवरून काँग्रेसने सरकारवर टीका करायला सुरवात केली आहे.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम म्हणाले, 'नागरिकांच्या हातात पैसे नसताना गरीब लोक जेवण आणि औषधे कशी खरेदी करु शकतात?, लॉकडाऊनच्या काळात ते जीवन कसे जगतील? याचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे. शिवाय, मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे. केंद्र सरकारने आवश्यक सुविधांसाठी राज्यांना निधी दिला नाही. तसेच, केंद्र सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबीयाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले नाहीत. याबद्दल आम्ही कडक शब्दांत निषेध करतो."

पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला एक सल्ला देताना म्हटले आहे की, 'केंद्र सरकार आपल्या २०२०-२१ च्या ३० लाख कोटीहून अधिक खर्च बजेटमधून ६५,००० कोटी रुपयांपर्यंत सहज काढू शकते. अर्थतज्ज्ञांनी दिलेला सल्ला आमलात आणला पाहिजे.'

दरम्यान, देशात कोरोनाची आतापर्यंत ९ हजार १५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या ७ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ३०८ जणांचा मृत्यू झाला असून, ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूर याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com