रस्त्यावरून आरामात गाडी चालवत होता अन्...

delhi police arrested fake ias in delhi roaming during lockdown
delhi police arrested fake ias in delhi roaming during lockdown

नवी दिल्ली : कोरोना व्हायसमुळे लॉकडाऊन असताना अनेकजण बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे प्रकार करताना दिसतात. असाच एक गंभीर प्रकार राजधानीत समोर आला आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

राजधानीमध्ये एक मोटारीवर भारत सरकारचे स्टिकर होते. शिवाय, मोटारीसमोर तिरंगा ध्वजही ठेवण्यात आला होता. पोलिसांनी मोटार थांबवल्यानंतर त्याने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. पोलिसांसमोर शेवटी अडखळला आणि त्याचे भिंग फुटले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीत लॉकडाऊन असतानाही एक युवक मोटार घेऊन आरामात गाडी चालवत होता. केशव पुरम येथे चौकशीसाठी मोटार आडविण्यात आली व कागदपत्रांची मागणी करण्यात आली. यावेळी त्याने आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले. ओळखपत्राची मागणी केल्यानंतर ते घरी विसरल्याचे सांगितले. मोटारीवर भारत सरकारचे स्टिकर असल्यामुळे सुरवातीला पोलिस कसून चौकशी करत नव्हते. पण, एका पोलिसाने धैर्याने त्याची चौकशी सुरू केली. यामध्ये तो गडबडला आणि त्याचे भिंग फुटले. चौकशीदरम्यान आदित्य गुप्ता असे त्याचे नाव असल्याचे उघड झाले. मोटारीसह त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

आदित्य गुप्ता हा कुटुंबासमवेत केशव पुरम भागात राहात असून, त्याचे वडील  कंत्राटदार आहेत. शिवाय, तो एका खासगी कंपनीत काम करत आहे. पोलिसांनी मोटार थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱयांशी गैरवर्तन करत त्यांच्यावर ओरडला पण अखरे जाळ्यात सापडला, असे पोलिस उपायुक्त विजयंत आर्य यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com