दिलासा! कोरोनाबळींमध्ये घट; 24 तासांत 1,422 जणांचा मृत्यू

corona virus.jpg
corona virus.jpg

coronavirus in india, covid-19, latest updates : कोरोना रुग्णांसोबतच मृतांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून सातत्यानं दररोज कोरोना मृताची संख्या घटत असल्याचं चित्र आहे. आरोग्य मंत्रलयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात एक हजार 422 जणांचा मत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यांमध्ये कोरोना मृताची संख्या 45 टक्केंनी घटली आहे. 14 ते 20 जून यादरम्यान नोंद झालेल्या कोरोना मृताची संख्या मागील नऊ आठवड्यातील सर्वात कमी आहे. मागील नऊ आठवड्यात पहिल्यांदाच एका आठवड्यात 14 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले. म्हणजेच, दररोज देशात दोन हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात 13 हजार 886 जणांचा मृत्यू झाला होता.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, रविवारी देशात 53 हजार 256 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील 88 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णवाढ आहे. शनिवारी देशात 58 हजार नवीन रुग्ण आढळले होते. रविवारी या आकडेवारीत आणखी घट पाहायला मिळाली. रविवारी देशात 78 हजार 190 जणांनी कोरोनावर मात केली.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण (Total cases) : 2,99,35,221

एकूण कोरोनामुक्त (Total discharges): 2,88,44,199

एकूण मृत्यू (Death toll) : 3,88,135

उपचाराधीन रुग्ण (Active cases) : 7,02,887

एकूण लसीकरण (Total Vaccination) : 28,00,36,898

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com