esakal | 24 तासांत देशात 38,079 नवे रुग्ण; 560 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona_204_3.jpg

24 तासांत देशात 38,079 नवे रुग्ण; 560 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Coronavirus in india, covid-19, latest updates : सध्या देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या 40 हजारांच्या आत नोंदली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 38 हजार 79 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 506 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत 43 हजार 916 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याचा देशाचा रिकव्हरी रेट 97.31 टक्केंवर पोहचला आहे.

देशाचा आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्केंपेक्षा कमी आहे. भारताचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट 2.10टक्के इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट 1.91 टक्के इतका आहे. मागील 26 दिवसांपासून भारताचा दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट तीन टक्केंपेक्षा कमी आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलै 2021 पर्यंत देशात 44 कोटी 20 लाख 21 हजार 954 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. बुधवारी देशात 19 लाख 98 हजार 715 इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: कोरोनानंतर Monkeypox चा धोका; अशी आहेत लक्षणे

loading image