कोरोनाचा कहर! संसदेतील 400 कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे 4 जज पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus over 400 parliament staff and 4 supreme court judges test positive

कोरोना : संसदेतील 400 कर्मचारी, सर्वोच्च न्यायालयाचे 4 जज पॉझिटिव्ह

दिल्ली : देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. त्याची झळ आता संसद (Parliament) आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत (Coronavirus in Supreme Court) पोहोचली आहे. मिडीया रिपोर्टनुसार सर्वोच्च न्यायालयातील 4 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली असून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी (parliament budget session) 400 पेक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या चार विद्यमान न्यायाधीशांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. यासोबतच रजिस्ट्रीतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे 150 कर्मचारी एकतर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत किंवा ते क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमण (Chief Justis N V Raman) यांनी गुरुवारी चार वरिष्ठ न्यायाधीशांची बैठक घेतली. या बैठकीत आता न्यायाधीश त्यांच्या निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांची सुनावणी करतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की,

सर्वोच्च न्यायालयाने 7 जानेवारीपासून संपूर्णपणे व्हर्च्युअल मोडवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सर्व न्यायाधीशांना त्यांच्या निवासी कार्यालयातून काम करण्याचा निर्णय घेतला असून याशिवाय, न्यायालयाने गुरुवारी एका परिपत्रकाद्वारे सांगितले होते की, 10 जानेवारीपासून केवळ तातडीच्या बाबी, ताजी प्रकरणे, जामीन प्रकरणे, ताब्यात घेणे आणि ठरलेली तारखेची प्रकरणे सूचीबद्ध केली जातील.

हेही वाचा: सुली डील्सचा मास्टरमाइंड ओंकारेश्वर ठाकूर याला इंदौरमधून अटक

संसदेत 400 हून अधिक कर्मचार्‍यांना कोरोना

प्रकरणे दुसरीकडे, संसद भवनात काम करणाऱ्या 400 हून अधिक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 6 आणि 7 जानेवारी रोजी संसदेत कार्यरत कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसद भवन संकुलात बाधितांची संख्या वाढू शकते. पॉझिटीव्ह येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे गुणोत्तर 1:1 आहे.

संसदेत काम करणाऱ्या किमान 400 कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या 6 ते 7 जानेवारी दरम्यान संसदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सर्व नमुने ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron Variant) तपासणीकरिता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा: Tata घेऊन येतेय स्वस्तात मस्त सीएनजी कार, काय असतील फीचर्स?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top