हृदयद्रावक व्हिडिओ; बाय डॅडी, बाय टू ऑल...

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जून 2020

एका मुलाने मृत्यूच्या काही वेळ अगोदर रुग्णालयातून आपल्या वडिलांसाठी व्हिडिओ पाठवला असून, सोशल मीडियावर तो प्रंचड व्हायरल झाला आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्हिडिओ वडिलांनी पाहिला.

हैदराबादः एका मुलाने मृत्यूच्या काही वेळ अगोदर रुग्णालयातून आपल्या वडिलांसाठी व्हिडिओ पाठवला असून, सोशल मीडियावर तो प्रंचड व्हायरल झाला आहे. मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित व्हिडिओ वडिलांनी पाहिला. नेटिझन्सनी रुग्णालयावर टीका करण्यास सुरवात केली आहे.

देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एका 34 वर्षीय युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्याचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला आहे. व्हिडिओद्वारे त्याने आपल्या वडिलांसाठी शेवटचा मेसेज दिला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. युवकाने रुग्णालयात रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की, 'मला श्वास घेता येत नाही, मी विनंती करुनही तीन तासांपासून रुग्णालयाने व्हेंटिलेटर काढला आहे. बाबा मला आता श्वास घेणे शक्य होत नाही. माझे ह्रदय बंद पडत आहे, असे वाटू लागले आहे. बाय डॅडी, बाय टू ऑल, डॅडी”.

हाय मित्रांनो; आम्ही चीनच्या सीमेवर चाललोय...

युवकाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलाला 10 खासगी रुग्णालयांनी दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. यामुळे उपचारासाठी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, सरकारी रुग्णालयात त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. ऑक्सिजनअभावी मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलाच्या मृत्यूला केवळ रुग्णालय जबाबदार आहे. मुलाने मृत्यूच्या काही वेळापूर्वी व्हिडिओ तयार करून मला पाठवला. पण, तो व्हिडिओ मी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पाहिला. मुलाचा व्हिडिओ पाहून खूप दुःख होत आहे. माझ्या मुलासोबत जे झाले असे कोणासोबत होऊ नये. माझ्या मुलाला ऑक्सिजन का दिला गेला नाही? इतर कोणाला इतकी गरज होती का? माझ्या मुलाचा ऑक्सिजन काढला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. माझ्या मुलाने मदत मागितली, पण कोणीही पुढे आले नाही. अंत्यसंस्कार करुन घरी आल्यानंतर मी हा व्हिडिओ पाहिला आहे.'

दरम्यान, मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. वडिलांनी एका खासगी रुग्णालयात मुलाचे नमुने चाचणीसाठी दिले होते. दुसऱ्या दिवशी रुग्णालयाने मुलाचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. युवकाचा कुटुंबातील सहा जणांशी संपर्क आला होता. यामुळे आता त्यांनाही करोनाची लागण झाली असल्याची भीती आहे.

हृदयद्रावक; नऊ महिन्यांचे बाळ एकटेच रांगत होते...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus patient last video goes viral at hyderabad