हाय मित्रांनो; आम्ही चीनच्या सीमेवर चाललोय...

india china border indian soldier video viral
india china border indian soldier video viral

नवी दिल्लीः 'हाय मित्रांनो, आम्ही चीनच्या सीमेवर चाललो आहोत, तम्ही सर्व मजेत राहा आम्ही शत्रूशी लढतो. पण, तु्म्ही एक काम करा यार...' असे बोललेल्या जवानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही तासांतच 46 लाखांहून अधिक जणांनी तो पाहिला आहे.

भारत-चीन सीमेवर गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात 20 जवान हुतात्मा झाले. यावेळी जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. चीन सैन्याच्या कमांडिंग ऑफिसरसह 43 जणांचा मृत्यू झाला आहे. लडाख भागातील पेनगॉंग सो येथे 5 मे पासून वाद सुरू आहे. भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण असून, सीमेवर अनेक हालचाली पाहायला मिळत आहेत. भारतानेही चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटरच्या नियंत्रण रेषेवर आपली ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनही नियंत्रण रेषेवर सातत्यानं सैनिकांची संख्या वाढवत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भारतानेही त्यांनी तोडीसतोड उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना सीमेवरील जवानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. संबंधित व्हिडिओ काही तासातच 46 लाख नेटिझन्सनी पाहिला असून, हजारो प्रतिक्रिया आल्या आहेत. संबंधित व्हिडिओ राजीव जाखड यांनी फेसबुकवरून शेअर करताना लिहिले आहे की, मित्रांनो आपला भाऊ काय सांगतो ते नीट ऐका...

व्हिडिओमध्ये जवानाने म्हटले आहे की, 'हाय मित्रांनो.. आम्ही चीन सीमेवर चाललोय आणि अडथळ्यांवर मात करून आम्हाला तिथे पोहोचायचे आहे. या ठिकाणी आल्यानंतर रस्ता संपतो आणि त्यानंतर डोंगरदऱ्यातून रस्ता काढत आम्हाला पुढे जावे लागते. या ट्रकमधून आम्ही जात आहोत. तुम्ही सर्व मजेत राहा आणि आम्ही देशासाठी शत्रूंशी लढतो. तुम्हीही एक काम करा यार...चिनी अॅप डिलीट करा आणि त्यांच्या वस्तूंवर बहिष्कार घाला. तुमच्या हृदयात देशभक्ती जागी करा. आम्ही पण येथे देशभक्त म्हणूनच लढत आहोत. एवढ्या खडतर परिस्थितीतही आम्ही इथे कर्तव्य बजावत आहोत. तुम्ही घरी बसून बोटांचा वापर करून चिनी वस्तूंवर बहिष्कार तर नक्की करू शकता. करा मित्रांनो, आम्हालाही बरं वाटेल. बाय..'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com