esakal | Coronavirus : केंद्राच्या मनाईनंतरही राज्याकडून पीपीई किट्स आणि व्हेन्टिलेटर्स खरेदी
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : PPE kits and ventilators Purchase from the State

पीपीई आणि मास्कची गुणवत्ता योग्य असणं आवश्यक आहे. गुणवत्ता चांगली नसेल तर, डॉक्टर-नर्स यांना संसर्ग होऊ शकतो. याचा विचार करून केंद्र सरकारने राज्यांवर या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु, त्यांनतरही राज्याने या वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Coronavirus : केंद्राच्या मनाईनंतरही राज्याकडून पीपीई किट्स आणि व्हेन्टिलेटर्स खरेदी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : पीपीई आणि मास्कची गुणवत्ता योग्य असणं आवश्यक आहे. गुणवत्ता चांगली नसेल तर, डॉक्टर-नर्स यांना संसर्ग होऊ शकतो. याचा विचार करून केंद्र सरकारने राज्यांवर या वस्तू खरेदी करण्यावर निर्बंध घातले आहेत. परंतु, त्यांनतरही राज्याने या वस्तू खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आता केंद्र आणि राज्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राच्या सूचनेनुसार महाराष्ट्राने केंद्राकडे 3 लाख 14 हजार पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन किट्स) 2142 व्हेन्टिलेटर्स, 8 लाख एन-95 मास्क आणि 99 लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी केली आहे. परंतु, या मागणी 12 दिवसापेक्षा जास्त दिवस उलटून गेले. तरीही राज्याला आतापर्यंत या वस्तू मिळाल्या नाहीत. तसेच, राज्यातला कोरोनाचा सततचा वाढता आकडा आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी पीपीई कीट उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसेच, एन-95 मास्कची गरज आहे. या सगळ्यांचा विचार करून राज्य सरकारने आता या वस्तूंची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू राज्यातच  सुरू केली आहे.

Coronavirus : यापेक्षा मोठी देशभक्ती नाही; सोनिया गांधीचा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

वैद्यकीय शिक्षण विभागानं आता त्यासाठी नवी मानकं ठरवून आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता जिल्हास्तरावर या वस्तूंची खरेदी करता येणार आहे. सध्या राज्यात 30 हजार पीपीई किट्स आणि सरकारी आणि महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजनेतील संलग्न रुग्णालय असे मिळून 3 हजारांपेक्षा जास्त व्हेन्टीलेटर उपलब्ध आहेत. तसेच 3 लाख एन-95 मास्क उपलब्ध असून 25 लाख ट्रिपल लेअर मास्क उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

दरम्यान PPE किट्स आणि एन-95 मास्कचं उत्पादन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच उत्पादन करावं, यासंबंधीचे निर्बंध राज्य सरकार घालणार असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत एका अधिकृत वेब पोर्टलवर याची माहिती देण्यात आली आहे.

loading image