esakal | मोदींनी घेतला मोठा निर्णय; यंदा होळीच्या कार्यक्रमात...
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

जगभरात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत असताना, भारतातही राजधानी दिल्लीमध्ये या रोगाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. इटलीहून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

मोदींनी घेतला मोठा निर्णय; यंदा होळीच्या कार्यक्रमात...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचे काही संशयित रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेत यंदा होळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत असताना, भारतातही राजधानी दिल्लीमध्ये या रोगाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. इटलीहून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. डीडी न्यूजच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इटलीहून आलेल्या 15 पर्यटकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. इटलीहून भारतात आल्यानंतर त्यांना आयटीबीपीच्या छावणीमध्ये ठेवण्यात आले होते. नोएडातील सहा जणांची टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे.

मोदींनी आज (बुधवार) सकाळी ट्विट करत म्हटले आहे, की जगभरातील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या प्रसारापासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी यावर्षी होळी मिलनच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.