esakal | कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना रेनकोट आणि मिठाई जीवनावश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना रेनकोट आणि मिठाई जीवनावश्यक

मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे लाखो लीटर दूध वाया जात आहे. त्याचबरोबर मिठाईचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची विनंती पश्चिम बंगालमधील मिठाई विक्रेत्यांनी केली होती.

कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना रेनकोट आणि मिठाई जीवनावश्यक

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकाता : कोरोनाव्हायरस झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका दिवसरात्र झटत असले तरी त्यांच्या सुरक्षिततेबाबत चालढकल केली जात असल्याचे पश्चिाम बंगालमध्ये दिसले. तेथील डॉक्टरांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ (पीपीई किट)ऐवजी रेनकोट, गॉगल आणि साधे कापडी मास्क देण्यात आले आहेत. रम्यान, लॉकडाऊनच्या कालावधीत पश्चिम बंगालमधील मिठाईची दुकाने आता चार तास उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचीच दुकाने उघडण्यास मंजुरी असताना बंगालने निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिलिगुडीतील नॉर्थ बेंगाल मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर शहरयार आलम यांनी याबाबत प्रशासनावर आरोप केला आहे. ‘एएनआय’शी बोलताना ते म्हणाले की, ‘पीपीई किट’ न दिल्याबद्दल आम्ही रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना भेटलो. किट मागविले आहेत. मात्र ते अद्याप आलेले नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले. किटसाठी आग्रह धरल्यावर त्यांनी आम्हाला कामावर न येण्याची सूचना केली.

आणखी वाचा - दिल्लीत 20 हजार घरं क्वारंटाइन; वाचा सविस्तर बातमी

प्रशासनाने आम्हाला केवळ रेनकोट, गॉगल आणि साधे मास्क देण्यात आले आहेत. त्यांनी आम्हाला रेनकोट रोजच्या रोज धुण्यास सांगितले असून, तेच परत वापरण्याचा सल्लाही दिला आहे.
- शहरयार आलम, वैद्यकीय अधीक्षक नॉर्थ बंगाल वैद्यकीय महाविद्यालय

मिठाई मिळणार
मिठाईची दुकाने बंद असल्यामुळे लाखो लीटर दूध वाया जात आहे. त्याचबरोबर मिठाईचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची विनंती पश्चिम बंगालमधील मिठाई विक्रेत्यांनी केली होती. बंगालमधील अनेक मिठाई दुकानात तिथेच आस्वाद घेण्याचीही व्यवस्था असते, पण त्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. बंगालवासियांसाठी मिठाई अत्यावश्यक आहे. बंगालमधील 60 टक्के दुधाचा उपयोग मिठाई करण्यासाठी होतो. आता दुपारी चार तास दुकाने ऊघडी ठेवल्यास त्याचा फारसा फायदा होणार नाही, असे के सी दास मिठाई दुकानाचे मालक धीमन दास यांनी सांगितले.