भारतावर पुन्हा कोरोनाचं संकट; 24 तासांत 11,739 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

भारतात कोरोना विषाणूची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत.

भारतावर पुन्हा कोरोनाचं संकट; 24 तासांत 11,739 नवे रुग्ण

नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूची (Coronavirus) प्रकरणं झपाट्यानं वाढत आहेत. रविवार, 26 जूनपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Ministry of Health) आकडेवारीनुसार, भारतात 11,739 नवीन कोविड -19 प्रकरणं नोंदली गेली आहेत. मंत्रालयानं सांगितलं की, गेल्या 24 तासांत 25 जणांचा मृत्यू झालाय. तर, गेल्या 24 तासांत कोविड-19 मधून 10,917 लोक बरे झाले आहेत. दरम्यान, शनिवारी कोरोनाचे 15,940 रुग्ण आढळले होते.

देशात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढं

भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 92 हजारांच्या पुढं गेलीय. आज कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 92,576 आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, एकूण संसर्गांपैकी 0.21 टक्के सक्रिय प्रकरणं आहेत, तर देशातील कोरोना बरं होण्याचं प्रमाण 98.58 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: योगींच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक, वाराणसीत हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

आकडेवारीनुसार, देशातील दैनंदिन सकारात्मकता दर (Positivity Rate) 2.59 टक्के नोंदवला गेलाय. साप्ताहिक सकारात्मकता दर 3.25 टक्के नोंदवला गेला. दरम्यान, कोरोना मृत्यू दर 1.21 टक्के नोंदवला गेला आहे. देशात आतापर्यंत 5,24,999 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर, देशातील कोरोना संसर्गाची एकूण संख्या 43.39 दशलक्षांवर पोहोचलीय.

हेही वाचा: कलम 21 रद्द करण्यात आलं, त्यावेळी भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला : मोदी

देशातील कोरोना लसीकरणाचा आकडा किती?

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 1,97, 08, 51,580 आहे. गेल्या 24 तासांत 12 लाख 72 हजार 739 लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतातील कोविड संख्या 19 डिसेंबर 2020 रोजी एक कोटीचा टप्पा ओलांडली होती. हा आकडा 4 मे रोजी दोन कोटी आणि गेल्या वर्षी 23 जून रोजी तीन कोटींच्या पुढं गेला होता. यावर्षी 25 जानेवारी रोजी भारतातील कोविडची संख्या चार कोटींचा टप्पा ओलांडलीय.

Web Title: Coronavirus Update India Logs 11 739 New Cases 25 Lost In 24 Hours Health Ministry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..