Corona Vaccine: एक एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस, अशी करा नोंदणी

corona_20vaccine_20main_0.jpg
corona_20vaccine_20main_0.jpg

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. याचदरम्यान 1 एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरु होणार आहे. आतापर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वयाचे नागरिक जे गंभीर आजाराने ग्रस्त आहेत, अशांना लस दिली जात होती. सरकारने लवकरात लवकर मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने नुकतेच हे पाऊल उचलले आहे. आता कोणताही व्यक्ती ज्याचे वय 45 पेक्षा जास्त आहे, त्यांना लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनही करता येईल आणि रुग्णालयातही जाऊन लस घेता येईल. 

लस कशी घ्यायची ?
ज्यांचे वय 45 पेक्षा जास्त आहे, ते दोन पद्धतीने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊ शकतात. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या दोन पद्धतीबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, कोविन वेबसाइट http://cowin.gov.in च्या माध्यमातून ऍडव्हान्समध्ये नोंदणी करता येऊ शकते. जर तुम्हाला ऍडव्हान्समध्ये नोंदणी करायचे नसेल तर तुम्हाला दुपारी तीननंतर जवळच्या रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस दिली जाते. त्या ठिकाणी जावे लागेल. तुम्ही तिथेही Covid-19ची लस घेता येईल. सध्या देशात दोन पद्धतीने कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. एक सीरम इन्स्टि्टयूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशील्ड आणि दुसरी भारत बायोटेकची कोवॅक्सिन आहे. 

कोरोना लस मोफत आहे का ?
कोरोनाची लस घेणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. कोरोनावरील लस मोफत दिली जाणार आहे का? किंवा खासगी रुग्णालयात लसीसाठी किती पैसे घेतात. सरकारने काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयातील एका डोससाठी कमाल 250 रुपये निश्चित केले होते. परंतु, मोफतही ही लस घेता येऊ शकते. यासाठी तुम्हाला सरकारी रुग्णालयात जावे लागेल. तिथेही मोफत कोरोना लस दिली जात आहे. 

कोणत्या कागदपत्रांची गरज आहे ?
लसीकरणात सहभागी होण्यासाठी सरकारकडून 12 ओळखपत्रांची एक यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, लोकप्रतिनिधींकडून जारी करण्यात आलेले ओळखपत्र, बँक/पोस्ट ऑफिस पासबूक, पासपोर्ट, पेन्शन दस्तावेज, सरकारी कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) अंतर्गत जारी करण्यात आलेले स्मार्ट कार्डचा समावेश आहे. लस घ्यायला जाणाऱ्या व्यक्तीला यापैकी एक ओळखपत्र स्वतःकडे ठेवणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्रावर हे ओळखपत्र दाखवावे लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरु होईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com