कोविड-19 वॅक्सिनसंदर्भात सकारात्मक बातमी; वर्षाखेरीस लस उपलब्ध होणार

 coronavirus, Covid 19, vaccine
coronavirus, Covid 19, vaccine

भारतामध्ये वर्षाच्या अखेरीस कोरोनावरील लस उपलब्ध होईल, असा दावा सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकार आदर पूनावाला यांनी केलाय. जगभरातील वेगवेगळ्या देशात लस तयार करण्यासंदर्भात काम सुरु आहे. लसीच्या निर्मितीमध्ये  भारतातील  सिरम इन्स्टिट्यूटती भूमिकेकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे. त्यामुळे आदर पुनावाला यांनी केलेला दावा हा सकारात्मकतेचा संदेश देणारा असाच आहे. एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीमध्ये त्यांनी लसीसंदर्भात भाष्य केले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लस लॉन्च करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दुसरीकडे जायडस कॅडिला कंपनीने लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात केली आहे. कंपनीचे प्रमुख पंकज पटेल यांच्या मते, आगामी वर्षाच्या मार्चपर्यंत लस उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे.  

याच वर्षात लस उपलब्ध होणार
सिरम इन्स्टिट्यूटने 7 ऑगस्ट रोजी  Gavi आणि बिल अँण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत भागीदारी केल्याची घोषणा केली होती.  कंपनी भारत आणि कमी उत्पन्न असलेल्या राष्ट्रांसाठी  कोविड-19 चे 100 मिलियन डोज तयार करणार आहे.  पूनावाला म्हणाले की,  आम्ही दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत चाचणीला सुरुवात करणार आहोत. ही चाचणी ICMR (इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च) च्या साथीने करण्यात येणार आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यत लस निर्मितीची प्रक्रिया सुरु होईल. जी लस तयार करण्यात येईल त्याची किंमत 3 डॉलरपेक्षा कमी असेल, असे पूनावाला यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.  
 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जायडस कॅडिलाकडून 1000 लोकांवर चाचणी  

जायडस कॅडिला कंपनीने ZyCoV-D नावानेच प्‍लाज्मिड डीएनए लस तयार केली आहे. कंपनीच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार,  पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलमध्ये स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. डेटा मॉनिटरिंग बोर्डाने लस सुरक्षित असल्याचा दाखला दिलाय. याच आधारावर दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्यात येणार असून 1000 स्वयंसेवकांची चाचणीमध्ये सहभागी करुन घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या अभ्यासानंतर मार्च 2021 पर्यंत लस उपलब्ध होईल, असा दावा या कंपनीकडून करण्यात आला आहे.  
 

100 मिलियन डोज तयार करण्याच लक्ष्य 

जायडस कॅडिला कंपनी पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या निर्मितीची परवानगी प्राप्त झाल्यानंतर  ZyCoV-D लसीचे  100 मिलियन डोस तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सर्वात प्रथम भारतीयांना लस उपलब्ध करुन देणे याला कंपनी प्राधान्य देणार असून त्यानंतर दुसऱ्या देशांचा विचार केला जाणार आहे. आतापर्यंत भारत सरकारने या कंपनीसोबत कोणताही करार केलेला नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com