भारत बायोटेकची चाचणी दुसऱ्या टप्पात; कंपनीवर लसीसाठी प्रचंड दबाव

bharat biotech covid vaccine second phase krishna ella statement
bharat biotech covid vaccine second phase krishna ella statement
Updated on

हैदराबाद : जगभरातील कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता, आमच्यावर लस (covid vaccine) शोधण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातोय, असं भारत बायोटेक (bharat biotech) या औषध निर्माण कंपनीनं स्पष्ट केलं. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत घाईने लस तयार करणार नाही, असंही इल्ला यांनी स्पष्ट केलंय. सध्या भारत बायोटेकच्या लसीची मानवी चाचणी दुसऱ्या टप्प्यात आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लसीचा दुष्परिणाम नाही!
भारत बायोटेक ही भारतातील ख्यातनाम औषध निर्माण कंपनी असून, हैदराबादमध्ये तिचं मुख्यालय आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारत बायोटेक कंपनीनेही कोरोना लसीवर संशोधन केला आहे. कंपनीचे संशोधन सुरू असून, त्याच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. नागपूरमधील गिल्लूरकर रुग्णालयात एका व्हॉलेंटिअरला ही कोरोना लस देण्यात आली असून, त्याच्या प्रकृतीवर कोणताही दुष्परिणाम झाला नसल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याच रुग्णालयात 55 जणांना भारत बायोटेकची लस देण्यात आली. त्यांच्यावरही लसीचा कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. 

आणखी वाचा - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आज, सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी

भारत चीनच्या कितीतरी पटीने पुढे
कोरोना लसी संदर्भात कृष्णा इल्ला म्हणाले, 'आमच्यावर कोरोनाची लस तयार करण्यासाठी प्रचंड दबाव आहे. पण, आम्ही माणसांची सुरक्षा आणि लसीचा दर्जा याला प्राधान्य देत आहोत. चुकीची लस देऊन, कोणाच्या जीवाला धोका पोहोचले, असं आम्हाला काही करायचं नाही.' मानवी चाचणीविषयी कृष्णा इल्ला म्हणाले, 'लसीची मानवी चाचणी आम्ही अतिशय योग्य पद्धतीनं करत आहोत. आमच्या चाचणीवर आंतरराष्ट्रीय संस्था लक्ष ठेवून आहेत. ही बाब आपल्या देशासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही लस तयार करण्यासाठी कोणताही 'शॉर्टकट्' वापरणार नाही. आम्ही निश्चितच अतिशय उच्च दर्जाची लस तयार करू.' साधारणपणे रोटाव्हायरसवरील लसीच्या मानवी चाचणीसाठी सहा महिने लागतात. मात्र, कोव्हॅक्सिनने पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणी 30 दिवसांत पूर्ण केली आहे. आता कंपनी दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी करत आहे. भारतीय औषध निर्माण उद्योग युरोप आणि अमेरिकेतील उद्योगापेक्षा कमी नाही आणि चीनी तंत्रज्ञान आणि मानवी चाचणीच्या कितीतरी पटीने पुढे आहे, असा दावा कृष्णा इल्ला यांनी केलाय. 

Story Created by Raviraj Gaikwad

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com