Coronavirus : बंगाल, मिझोराममध्ये लॉकडाउन वाढवला 

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 11 June 2020

बंगालमध्ये आतापर्यंत ७,७३८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३८३ जणांचा मृत्यू झाला आहे.त्याचबरोबर मिझोरामध्येही दोन आठवड्यासाठी लॉकडाउन वाढविला आहे. याबाबतची नवीन गाइडलाइन लवकरच जारी करण्यात येणार आहे.

कोलकता/ आयजॉल -  कोरोनाची वाढती तीव्रता लक्षात घेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाला त्यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. बंगालमध्ये आतापर्यंत ७,७३८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून ३८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर मिझोरामध्येही दोन आठवड्यासाठी लॉकडाउन वाढविला आहे. याबाबतची नवीन गाइडलाइन लवकरच जारी करण्यात येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पश्‍चिम बंगालमध्ये १५ जूनपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला होता. यावेळी काही अटींवर सूट देण्यात आली होती. पण आजपासून दोन महिन्याच्या खंडानंतर सोशल डिस्टिन्सिंगचे पालन करत रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल्स, सरकारी आणि खासगी कार्यालय सुरू झाले. त्याचबरोबर मंदिर, मशिद, आणि चर्च देखील काही अटींवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सूतगिरणी, बांधकाम क्षेत्रालाही मूभा दिली आहे. यादरम्यान मिझोराममध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दोन आठवड्यासाठी लॉकडाउनमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. राज्यात क्वारंटाइनचा कालावधी हा १४ दिवसांहून २१ पर्यंत वाढविला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus West Bengal to extend lockdown till 30 June