esakal | लॉकडाऊनमुळे बायको माहेरी अडकली आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus wife stuck up in lockdown angry man weds his ex flame

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. मात्र, एकाने बायको माहेरी अडकून पडल्याच्या रागातून दुसऱया युवतीशी लग्न केल्याची घटना येथे घडली.

लॉकडाऊनमुळे बायको माहेरी अडकली आणि...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

पाटणा (बिहार): देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. मात्र, एकाने बायको माहेरी अडकून पडल्याच्या रागातून दुसऱया युवतीशी लग्न केल्याची घटना येथे घडली.

पोलिसांवर दगडफेक केलेल्या भागात कोरोनाचा कहर...

बिहारच्या दुल्हनीबाजार येथे ही घटना घडली आहे. भरतपुरामधील धीरजकुमारचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गेल्या महिन्यात काही कारणाने त्याची बायको माहेरी गेली होती. ती माहेरी गेल्यावरच लॉकडाऊनची घोषणा झाली. प्रवासाची सुविधा बंद झाल्यामुळे पत्नी भरतपुरामध्ये परत येऊ शकली नाही. धीरजने पत्नीला सतत घरी येण्यासाठी आग्रह करत होता. पण, लॉकडाऊनमुळे येता येत नव्हते. लॉकडाऊन संपला की लगेच येते म्हणून तिने सांगितले. तिच्या उत्तरावर तो चिडला होता.

रतन टाटा यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या...

धीरज शेजारील गावात गेला आणि प्रेयसीसोबत विवाह करून आला. याबाबतची माहिती पत्नीला समजल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी धीरजविरोधात हुंडाबळी, बायकोचा छळ, फसवणूक आणि बायकोला अंधारात ठेवत दुसरे लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. धीरजला ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

loading image