रतन टाटा यांना 'भारतरत्न' पुरस्कार द्या...

ratan tata
ratan tata

नवी दिल्ली : टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी एक ऑनलाईन याचिकेद्वारे करण्यात आली आहे. एका नेटिझन्सने चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. जगभरातील नेटिझन्सनी पाठिंबा दर्शविला आहे.

रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी या ऑनलाईन याचिकेमधून करण्यात आली आहे. यामध्ये लिहले आहे की, 'रतन टाटा हे परोपकार आणि मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी अनेक संशोधनासाठी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था उभारण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय, या याचिकेमध्ये रतन टाटा यांनी मदत केलेल्या सर्व संस्थांची यादी देण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या समाजसेवेची पण यादी देण्यात आली आहे.'

दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी टाटा ट्रस्ट आणि उद्योगसमुहाच्या वतीने त्यांनी तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत देणार असल्याचे जाहीर केलं आहे. देश आणि जगासमोरचं संकट हे अतिशय मोठं आहे. त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. ती काळाची गरज आहे. मानवते समोरचं हे सगळ्यात मोठे आव्हान आहे, असेही रतन टाटांनी म्हटले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत 1 हजार 500 कोटींच दान दिल्यानंतर टाटा समुहाने आणखी एक मोठा घेतला. त्यांच्या ताज ग्रुपच्या मुंबईतल्या फाईव्ह स्टार हॉटेल्समध्ये आता कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना रुम्स मिळणार आहेत. अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स जर आपल्या कुटुंबीयांसोबत राहिले तर त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांना वेगळं राहण्याची गरज असते. त्यामुळे समुहाने हा निर्णय घेतला आहे. कुलाब्यातलं हॉटेल ताज महल, बांद्र्यातलं ताज लँड्स, सांताक्रुजमधलं हॉटेल ताज आणि हॉटेल प्रेसिडंट या हॉटेल्समध्ये डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी या रुम्स देण्यात आले आहे.

सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या बद्दल आदर असणारा मजकूर व्हॉट्सऍपवरून मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com