
Indian Air Force 93rd Anniversary Corporal Varun Kumar Left Hand Salute Viral Video
esakal
Corporal Varun Kumar Left Hand Salute Video : हिंदान वायुसेना तळावर 8 ऑक्टोबर 2025 ला भारतीय वायुसेनेचा 93 वा वर्धापन दिन साजरा झाला. या सोहळ्यात कॉर्पोरल वरुण कुमार यांनी डाव्या हाताने दिलेल्या सलामने सर्वांचे लक्ष वेधले आणि उपस्थितांच्या मनाला भावनिक स्पर्श केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये उजवा हात गमावलेल्या वरुण यांना वायुसेना पदक (शौर्य) प्रदान करण्यात आले. त्यांचा हा सलाम केवळ औपचारिकता नव्हता तर त्यांच्या धैर्याचा आणि देशाप्रती अटळ निष्ठेचा प्रतीकात्मक संदेश होता.