

महाराष्ट्रात कृषी विभागात घोटाळा झाल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केले होते. या आरोपांना केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह यांनी उत्तर दिलंय. भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करू असं शिवराज सिंह यांनी सांगितलं. लोकसभेत केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की, सरकार अनियमितता सहन करणार नाही. तपासात जर कुणी भ्रष्टाचार केल्याचं आढळलं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.