भारताला पहिला 'ऑस्कर' मिळवून देणाऱ्या कॉस्च्युम डिझायनर भानू अथैया यांचे निधन

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

अनेक चित्रपटात त्यांनी कॉस्ट्यूम डिजाइनिंगचे काम केले आहे. या क्षेत्रात त्यांनी विशेष उंची प्राप्त केली होती. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या सीआयडी या देवआनंद स्टार चित्रपटातून त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती.

मुंबई : भारताला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या प्रसिद्ध कॉस्ट्यूम डिझायनर (वेशभूषा डिझायनर) भानु अथैया यांचे गुरुवारी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या प्रकृती अस्वस्थामुळे त्रस्त होत्या. त्यांच्या मुलीने त्यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर बॉलिवूडसह अन्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   

अनेक चित्रपटात त्यांनी कॉस्ट्यूम डिजाइनिंगचे काम केले आहे. या क्षेत्रात त्यांनी विशेष उंची प्राप्त केली होती. 1956 मध्ये प्रदर्शित झालेल्या सीआयडी या देवआनंद स्टार चित्रपटातून त्यांनी आपल्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'गांधी' या चित्रपटामुळे त्यांना खास ओळख मिळाली.  1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या  रिचर्ड एटनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटासाठी भानू यांना सर्वोत्तम कॉस्ट्यूम डिजाइनरचा पुरुस्कार मिळाला होता. त्यांनी गुरुदत्त, राज कपूर, यश चोप्रा आणि आशुतोष गोवारिकर यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले.   

हॉलीवूडमध्येही केलं होतं काम 

100 पेक्षा अधिक बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या भानू यांनी यांनी केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही काम केले होते. आमिर खानचा ऑस्करपर्यंत धडक मारलेला 'लगान' आणि  शाहरुख खानचा 'स्वदेस' या दोन शेवटच्या चित्रपटात त्यांनी कॉस्ट्यूम डिजाइनिंगचे काम केले होते.   
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Costume designer Bhanu Athaiya Indias first Oscar winner dies after prolonged illness