
भोपाळः मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात खोकल्याच्या औषधामुळे नऊ चिकमुल्यांचा मृत्यू झाला होता. कोल्ड्रिप सीरप घेतल्याने या मुलांची किडनी निकामी झाल्याचं तपासातून पुढे आलं आहे. सुरुवातीला ७ सप्टेंबर रोजी पहिल्या मुलाचा मृत्यू झाला. पुढे ही संख्या वाढून नऊपर्यंत पोहोचली आहे. ही सर्व मुलं १ ते ५ वर्षांच्या आतली होती.