
Madhya Pradesh CM: मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बैतूल आणि पांढुर्णा जिल्ह्यात ७ सप्टेंबरपासून आतापर्यंत २१ चिमुकल्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचं कारण सर्दी-खोकल्याचं औषध (कफ सीरप) ठरलंय. सर्वात जास्त १७ मुलं छिंदवाडा इथले आहेत. या घटनेमुळे देश हादरला असून तमिळनाडू येथील औषध कंपनीच्या मालकाला अटक झाली आहे.