
पती-पत्नीमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून दोघांचाही मृत्यू झाला. शनिवारी पत्नीने ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आणि रविवारी सकाळी पतीचा मृतदेहही रेल्वे रुळावर आढळून आला. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे घरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील आग्र्यात घडली.