कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम : स्टडी | Pandemic | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस डेल्टा, ओमिक्रॉनविरूद्ध कार्यक्षम : स्टडी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना (Corona) संसर्ग होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, वाढत्या रूग्णसंख्येत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी एका अभ्यासातून समोर आली आहे. (Covaxin Booster Shot News )

कोवॅक्सीनचा बूस्टर डोस कोरोनाच्या ओमिक्रॉन प्रकारातील BA.1.1 आणि BA.2 विरुद्ध अतिशय प्रभावी असून, यामुळे नागरिकांचे लागण होण्यापासून संरक्षण करण्यास आणि कार्यक्षमता वाढवण्यास मदतगार ठरत आहे. एवढेच नव्हे तर, कोवॅक्सिनचा बूस्टर डोस कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरूद्धदेखील प्रभावी ठरत असल्याचे सांगण्यात आले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: कोरोनामुळे 'ई-लर्निंग'ला बूस्टर डोस; भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

राज्यात कोरोना वाढताच; मुंबईत बाधितांचे प्रमाण अधिक

गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढताच असून, 24 तासांत राज्यात 2956 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 2165 जणांनी कोरोनावर मात केली असून, चार जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात नोंदवण्यात आलेल्या 2656 रूग्णांपैकी 1724 रूग्ण एकट्या मुंबईतील आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Corona Update)

हेही वाचा: पुढील चार महिन्यांत कोट्यावधी कोरोना लसी होतील नष्ट, कारण...

दरम्यान, राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचा प्रमाण 97.90 टक्के झाले असून मृत्यूदर 1.86 टक्क्यांवर नोंदवण्यात आला आहे. सध्या राज्यात 18,267 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली असून, यातील सर्वाधिक सक्रीय कोरोना बाधित हे मुंबईत नोंदवण्यात आले आहे. मुंबईत सध्या 11,813 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नुकत्यात आलेल्या NIV च्या रिपोर्टनुसार ठाण्यात बीए. 5 व्हेरियंटचे आणखी दोन रुग्ण आढळून आले असून, ते 28 आणि 30 मे रोजी संक्रमित आढळले होते. दिलासादायक बाब म्हणजे हे दोन्ही रूग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.

Web Title: Covaxin Booster Shot Enhances Efficacy Against Delta Omicron Variants Of Covid 19 Study

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top