डेल्टा प्लस व्हेरिअंटवर कोव्हॅक्सिन ठरतेय प्रभावी - ICMR | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covaxin

कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमसुद्धा वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 कोटींहून जास्त लोकांना लस देण्यात आली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिअंटवर कोव्हॅक्सिन ठरतेय प्रभावी - ICMR

नवी दिल्ली - देशात कोरोनाचे प्रत्येक दिवशी 40 ते 45 हजार नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहिमसुद्धा वेगाने सुरु आहे. आतापर्यंत 47 कोटींहून जास्त लोकांना लस देण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड, स्पुटनिक व्ही या लशींचे डोस देशात दिले जात आहे. यातील कोव्हॅक्सिन ही लस आता डेल्टा व्हेरिअंटवर प्रभावी ठरत असल्याचं एका मेडिकल स्टडीमध्ये समोर आलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिअंट डेल्टा प्लस हा धोकादायक आहे. या व्हेरिअंटवरसुद्धा कोव्हॅक्सिन प्रभावी ठरल्याचं या अभ्यासात समोर आलं आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटला नष्ट करण्यासाठी ही लस प्रभावी ठरल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे.

हेही वाचा: अमृत महोत्सवाची सुरुवात होताच मिळाली खूशखबर - PM मोदी

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांनी कोरोना व्हॅक्सिन आणि कोरोनाचा नवा व्हेरिअंट डेल्टा प्लस याबाबत एक संशोधन केलं. त्यात अशी माहिती समोर आली की, कोरोनाचा सर्वात धोकादायक मानला जाणाऱ्या डेल्टा प्लस व्हेरिअंटवर कोव्हॅक्सिन प्रभावी आहे. आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी म्हटलं की, कोव्हॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिअंटला मुळापासून नष्ट करेल. ही लस डेल्टा प्लस व्हेरिअंटविरोधात प्रभावी ठरेल.

Web Title: Covaxin Effective Against Delta Plus Variant Of Covid19 Icmr Study

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaCovaxin