esakal | Covaxin: 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल ट्रायल जूनपासून
sakal

बोलून बातमी शोधा

child vaccination

देशात कोरोनाचा (corona) संसर्ग वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

Covaxin: 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल ट्रायल जूनपासून

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात कोरोनाचा (corona) संसर्ग वाढत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. सध्या 18 वर्षांपुढील नागरिकांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. पण, आता लहान मुलांच्या लसीकरणाचीही शक्यता निर्माण झाली आहे. कारण, हैदराबाद स्थित भारत बायोटेकने 2 ते 18 वयोगटातील मुलांवरील क्लिनिकल ट्रायल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यापासून मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Covaxin Phase 2 and 3 clinical trials for 2 to 18 age group to begin in June)

कोवॅक्सिन या स्वदेशी लशीचे उत्पादन भारत बायोटेकने आयसीएमआरच्या मदतीने केले आहे. देशातील 18 वर्षांपुढील नागरिकांना या लशीचा डोस दिला जात आहे. आता लहान मुलांसाठीही लसीकरण सुरु होणार आहे. त्याआधी कोवॅक्सिनचे 2 ते 18 वयोगटातील मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल घेतले जाणार आहे. भारत बायोटेकमधील सूत्रांनुसार, जून महिन्यापासून ट्रायल सुरु होतील. मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारकडून भारत बायोटेकला यासाठी परवानगी मिळाली होती.

हेही वाचा: मुलांवर कोरोनाच्या गंभीर परिणामांची स्पष्टता नाही - केंद्र सरकार

माहितीनुसार, 525 मुलांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात येईल. 0 ते 28 दिवसांच्या अंतरात लशीचे दोन डोस येण्यात येतील. या ट्रायलसाठी देशातील वेगवेगळ्या हॉस्पिटलची निवड करण्यात आली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 13 मे रोजी भारत बायोटेकला 2 ते 18 वयोगटातील लहान मुलांवर कोरोनावरील लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी दिली होती. क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: भावाच्या लग्नात महिला तहसीलदाराचा डान्स

दरम्यान, देशातील संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) लहान मुलांवर मोठा परिणाम होईल असे अद्याप कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असं केंद्र सकारनं स्पष्ट केलं आहे. बालरोगतज्ज्ञांच्या (pediatricians) म्हणण्यानुसार, हा दावा तथ्यांवर आधारित नाही. त्यामुळे कदाचित लहान मुलांवर तिसऱ्या लाटेचा मोठा परिणाम होणारही नाही, त्यामुळे लोकांनी घाबरण्याचं कारण नाही, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केलं आहे.

loading image