काँग्रेस आमदाराच्या 16 वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

विभूने त्याच्या काही मित्रांना आत्महत्येआधी मेसेज पाठवले होते. त्यात लिहिलं होतं की, 'तुम्ही सर्वजण चांगले आहात. स्वत:ची काळजी घ्या.'

काँग्रेस आमदाराच्या मुलाची आत्महत्या; सुसाइड नोट सापडली

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जबलपूर - काँग्रेस आमदार संजय यादव यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विभू यादव असं मुलाचं नाव असून त्याने घरी लायसन्स असलेल्या पिस्तूलातुन स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. १६ वर्षांच्या विभूने आत्महत्या का केली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र घटनास्थळी सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, माझे आई, वडिल, भाऊ सगळे चांगले आहेत. मला त्यांचा काही त्रास नाही. मी माझ्या मित्रांकडे जात आहे.

जबलपूरच्या बरगी मतदारसंघातील आमदार संजय यादव यांच्या मुलाने विभूने डोक्यात गोळी मारून घेत आत्महत्या केली. गोळीच्या आवाजाने घरातले जेव्हा त्याच्या खोलीकडे आले तेव्हा विभू रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र विभूचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा: ‘जीएसटी’ संकलन अपेक्षेपेक्षा अधिक

आत्महत्येची माहिती मिळताच एफएसएलची टीम आमदार संजय यादव यांच्या घरी पोहोचली. आत्महत्येच्या कारणांचा शोध आणि घटनास्थळी तपास केला जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहेत. विभूच्या डोक्यात गोळी लागली असून इतर माहिती शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच समजू शकेल.

विभूने त्याच्या काही मित्रांना आत्महत्येआधी मेसेज पाठवले होते. त्यात लिहिलं होतं की, 'तुम्ही सर्वजण चांगले आहात. स्वत:ची काळजी घ्या.' विभू हा मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. तो पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याची तयारीसुद्धा करत होता. पण त्याआधीच त्याच्या आत्महत्येनं कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

loading image
go to top