
लहान मुलांसाठी लस; भारतात क्लिनिकल चाचणीसाठी मंजूरी
भारतासह जगभरात करोना विषाणूच्या (COVID-19) दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर जास्त परिणाम होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत करोनावरील लसीवर जगभरात संशोधन सुरू आहे. अमेरिकेनं 12 ते 18 वर्षांतील मुलांना लस देण्याची आपतकालीन परवानगी दिली आहे. मात्र, मुलांना ही लस किती परिणामकारक आहे, याबाबत अद्याप कोणताही माहिती नाही. काही देशांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात यशही मिळालं आहे. परंतु अशातच आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सीन (Bharat Biotech's COVID-19 vaccine Covaxin) लसीला दोन ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी (clinical trial) मुंजूरी मिळाली आहे.
सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने (SEC) मंगळवारी उशीरा याबातचा निर्णय घेतला. 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीला क्लिनिकल चाचणीला परवानगी दिली आहे. पुढील काही दिवसांत कोव्हॅक्सीनची (Bharat Biotech's COVID-19 vaccine Covaxin) दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी (clinical trial) होईल. यामध्ये भारत बायोटेकला यश आल्यास, जगभरातील ही पहिली कंपनी ठरणार आहे. आतापर्यंत लहान मुलांसाठी कोणतीही लस आलेली नाही.
हेही वाचा: लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक; कारण...;पाहा व्हिडिओ
कोव्हॅक्सीनची (Bharat Biotech's COVID-19 vaccine Covaxin) क्लिनिकल चाचणी 525 जणांवर करण्यात येणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटना एम्स, नागपुरमधील MIMS या रुग्णालयात कोव्हॅक्सीनची क्लिनिकल चाचणी पार पडणार आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीनुसार (SEC) तिसरी क्लिनिकल चाचणी सुरु करण्यापूर्वी भारत बायोटेकला दुसऱ्या चाचणीचा डेटा उपलब्ध करावा लागणार आहे.
Web Title: Covaxin Recommended By Expert Panel For Phase 23 Trials On 2 To 18 Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..