लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर कोव्हॅक्सिनचे दोन डोस ५० टक्के प्रभावी; अभ्यासात दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर कोव्हॅक्सिनचे दोन डोस ५० टक्के प्रभावी - Study

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीचे दोन्ही डोस कोरोनाची लक्षणं असलेल्या रुग्णांवर ५० टक्के प्रभावी असल्याचा दावा लँन्सेंटने केला आहे. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात असा दावा केला आहे. लॅन्सेंटमध्ये नुकताच एक रिव्ह्यू प्रकाशित झाला होता. यात कोव्हॅक्सिन कोरोनाच्या लक्षणं असलेल्या रुग्णांवर ७७.८ टक्के प्रभावी असल्याचं आणि याचे गंभीर दुष्परिणाम नसल्याचं म्हटलं होतं.

नव्या अभ्यासानुसार १५ एप्रिल ते १५ मेपर्यंत दिल्लीतील एम्समध्ये २७१४ आरोग्य कर्मचाऱ्यांवर याबाबत अभ्यास करण्यात आला. कोरोनाची लक्षण असलेल्या आणि आरटीपीसीआर चाचणी करण्यात आलेल्यांचा समावेश होता. जेव्हा हा अभ्यास कऱण्यात आला तेव्हा भारतात, डेल्टा व्हेरिअंटने धुमाकूळ घातला होता. तसंच कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांमध्ये हा व्हेरिअंट आढळला होता.

हेही वाचा: ड्रग्ज कमी प्रमाणात बाळगणे गुन्हा नाही? सरकार विधेयक मांडणार

लँसेंटने त्यांच्या आधीच्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की, कोव्हॅक्सिन लस कोरोनाची लक्षणं असेलल्या रुग्णांवर ७७.८ टक्के प्रभावी ठरली. तर गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर ९३.४ टक्के प्रभावी असल्याचं समोर आलं होतं. तर लक्षणं नसलेल्या रुग्णांवर ६३.६ टक्के परिणामकारक ठरली होती. तर डेल्टा व्हेरिअंटवर ६५.२ टक्के प्रभावी ठरली होती.

loading image
go to top