esakal | कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

कोरोना लसीच्या बूस्टर डोसची सध्या आवश्यकता नाही - Lancet Report

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना विरुद्धच्या लढाईत जगातील सर्वच देशांत सध्या लसीकरणाची (Covid-19 Vaccine) मोहीम सुरु आहे. कोरोना विषाणूचे व्हेरियंट आणि त्यामुळे होणारे परिणाम पाहता लस बणविणाऱ्या अनेक कंपन्यांनी लसीनंतर बुस्टर डोस (Covid-19 Booster Dose) देखील घ्यावा लागणार असल्याचे सांगितले आहे. मात्र आता बुस्टर डोसची सध्या गरज नाही असा निष्कर्श शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आला आहे.

शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टीमने केलेल्या संशोधनात कोरोना विषाणू, तसेट डेल्टा व्हेरियंटसाठी देखील बुस्टर डोसची गरज नसल्याचे समोर आले आहे. LANCET ने दिलेल्या अहवालातून ही माहीती समोर आली असून, जागतिक आरोग्य संघटना आणि अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या तज्ञांनी देखील हेच निरीक्षण नोंदवले आहे.

हेही वाचा: मुलांच्या सार्वत्रिक लसीकरणाची अद्यापही शिफारस नाही - नीती आयोग

संशोधनतून समोर आलेल्या अहवालानुसार सध्या होणाऱ्या लसीकरणाची डेल्टा आणि अल्फा व्हेरियंट विषाणूशी लढण्यासाठी ९५ टक्के सक्षम आहे. तसेच या व्हेरियंटपासून होणाऱ्या इन्फेक्शनपासून संरक्षण करण्यासाठी देखील लसी ८० टक्के सक्षम आहेत. यामध्ये सर्व लसींचा समावेश असल्याचे देखील या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी बुस्टर डोसची आवश्यकता नसल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

दरम्यान, लहान मुलांसाठी सार्वत्रिक लसीकरणाची जागतीक आरोग्य संघटनेनं अर्थात WHOनं अद्यापही शिफारस केलेली नाही. पण त्यामुळं घाबरुन जाण्याचं कारण नाही. पण देशातील सर्व प्रौढ जनतेच्या पूर्ण लसीकरणावर सध्या आमचा भर आहे, असं नीती आयोगाचे आरोग्य सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top