Covid 19 Cases in India: कोरोनाने पुन्हा जोर पकडला, एका दिवसात आढळले 335 नवीन रुग्ण

कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.
Covid-19 India reports
Covid-19 India reports

Covid 19 Cases in India: थंडीचा मोसम आल्यापाठोपाठ देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सरत्या चोवीस तासात 335 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून रविवारी देण्यात आली. यापाठोपाठ सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढून 1701 वर गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्यांची संख्या 5 लाख 33 हजार 316 इतकी आहे. तर रिकव्हरी दर 98.81 टक्के इतका आहे. कोरोनापासून बचावासाठी आतापर्यंत 220.67 कोटी लसी देण्यात आल्या आहेत.

भारतातील JN.1 उप प्रकारांची स्थिती -

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, केरळमध्ये 13 डिसेंबर रोजी नवीन कोरोना व्हायरस JN.1 प्रकार आढळून आला. भारतीय SARS-CoV-2 Genomics Consortium (INSACOG) च्या नवीन डेटाने देखील केरळमध्ये त्याची उपस्थिती उघड केली आहे. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन म्हणाले की, भारतात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. त्यात JN.1 देखील असू शकतो.

Covid-19 India reports
Multibagger Stock: लिस्टिंगनंतर 5 महिन्यातच स्टॉक स्प्लिटची घोषणा; कंपनीचा शेअर अप्पर सर्किटवर

लक्षणे काय आहेत?

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, सध्या हे माहित नाही की कोविड -19  JN.1 मध्ये इतर प्रकारांपेक्षा वेगळी लक्षणे आहेत की नाही. सध्या लक्षणे सारखीच मानली जातात. यामध्ये ताप, सततचा खोकला, लवकर थकवा, नाक बंद पडणे, नाक वाहणे, जुलाब, डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात. (Latest Marathi News)

Covid-19 India reports
India Alliance: इंडिया आघाडीत पुन्हा एकदा पेच... अरविंद केजरीवालांच्या भूमिकेमुळे सर्वांना टेन्शन!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com