
'भारतानं आपल्या आरोग्यसेवेच्या बजेटसाठी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम दिलीय.'
WHO मध्ये सुधारणा आवश्यक, भारत महत्त्वाची भूमिका बजावण्यास तयार : मोदी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज (गुरुवार) सायंकाळी कोविड-19 ग्लोबल व्हर्च्युअल समिटमध्ये (Covid-19 Global Virtual Summit) सहभागी झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि जगातील इतर अनेक राष्ट्रप्रमुखही या शिखर परिषदेचा भाग बनले आहेत. शिखर परिषदेतील भाषणादरम्यान मोदी म्हणाले, 'भारतानं आपल्या आरोग्यसेवेच्या बजेटसाठी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम दिलीय. आमचा लसीकरण कार्यक्रम जगातील सर्वात मोठा आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरुय, त्यात सुधारणा आवश्यक आहे.'
मोदी पुढं म्हणाले, भारताच्या जीनोमिक्स कन्सोर्टियमनं (Genomics Consortium) व्हायरसच्या जागतिक डेटाबेसमध्ये योगदान दिलंय. आम्ही हे नेटवर्क आमच्या शेजारी देशांपर्यंत वाढवू. भारतात कोविड विरुद्धच्या आमच्या लढ्याला पूरक ठरण्यासाठी आणि असंख्य जीव वाचवणारी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आम्ही आमची पारंपरिक औषधं मोठ्या प्रमाणावर वापरत आहोत, असं मोदींनी सांगितलंय.
हेही वाचा: आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय; पटेलांनी काँग्रेसला फटकारलं
मोदींनी महामारीचा सामना करण्याच्या प्रयत्नांवर अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पंतप्रधान म्हणाले, आम्ही आमच्या लोकसंख्येपैकी 90 आणि 5 कोटी मुलांना पूर्णपणे लसीकरण केलंय. भारत WHO ने मंजूर केलेल्या चार लसींचं उत्पादन करत आहे. भारतामध्ये यावर्षी 5 अब्ज डोस तयार करण्याची क्षमता आहे. गेल्या महिन्यात आम्ही भारतात WHO सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची पायाभरणी केलीय. भविष्यातील आरोग्य आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी जागतिक प्रतिसाद आवश्यक आहे. आम्ही 200 दशलक्ष डोस 98 देशांना द्विपक्षीय आणि Covex द्वारे 200 देशांना पुरवले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
Web Title: Covid 19 Global Virtual Summit India Ready To Play Important Role Against Corona Narendra Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..