आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय; हार्दिक पटेलांनी काँग्रेस हायकमांडला फटकारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Patel

'निवडणुकीपूर्वी मोठं पद स्वीकारण्यासाठी आम्हाला नेतृत्वावर दबाव आणायचा नाहीय.'

आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय; पटेलांनी काँग्रेसला फटकारलं

गुजरात काँग्रेसचे नेते (Gujarat Congress) हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत, तर दुसरीकडं पक्षाच्या हायकमांडलाही फटकारलंय. हार्दिक पटेल म्हणाले, आम्ही वेगळ्या प्रकारचे नेते आहोत, कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय. आम्ही स्वतःचं स्थान निर्माण केलंय, असं परखड मत मांडत हार्दिक पटेल यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय. पटेल पुढं म्हणाले, काँग्रेसनं मला कार्याध्यक्ष केलं; पण माझी जबाबदारी निश्चित नाहीय. आता निवडणुकीला काही महिने उरले असून माझी भूमिका काय आहे हे लोकांना जाणून घ्यायचं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा: मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : ईडीच्या अटकेत असलेल्या IAS अधिकारी पूजा सिंघल निलंबित

एनडीटीव्हीशी संवाद साधताना हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि सोनिया यांची नावं घेत माझं कोणाशीही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. आम्ही वेगळ्या प्रकारचे नेते आहोत. कारण, आम्ही कोणत्याही विशिष्ट कुटुंबातून आलेलो नाहीय. आम्ही खूप मेहनत करून गुजरातमध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय. निवडणुकीपूर्वी मोठं पद स्वीकारण्यासाठी आम्हाला नेतृत्वावर दबाव आणायचा नाहीय. 1990 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसनं राज्यात 80 पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर..; संजय ठाकुरांचा थेट इशारा

पाटीदार नेत्यानं पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वाला आपली भूमिका ठरवण्याची मागणी केलीय. 'तुम्ही मला कार्याध्यक्ष केलंय; पण माझी जबाबदारीही निश्चित करावी. दोन वर्षे झाली, तुम्ही माझी भूमिका का ठरवली नाही? राज्यात माझ्यासोबत पत्रकार परिषदही घेण्यात आलेली नाहीय. एवढंच नाही तर गुजरातमध्ये आल्यानंतर राहुल गांधींची भेट घेऊ दिली जात नाहीय, असा आरोप त्यांनी केलाय.

Web Title: Gujarat Hardik Patel Mocked The Congress High Command

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top