esakal | मोठा निर्णय! ब्रिटनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट
sakal

बोलून बातमी शोधा

uk corona.jpg

मोठा निर्णय! ब्रिटनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमधून सूट

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : ब्रिटनने भारतातील प्रवाशांसाठीची जाचक क्वारंटाइनचा नियम रद्द केल्यानंतर भारतानंही युकेमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांवरील क्वारंटाइनचा नियम मागे घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देताना सांगितलं की, १ ऑक्टोबर २०२१ ला भारतात येणाऱ्या ब्रिटनच्या नागरिकांसाठी असलेली नियमावली मागे घेण्यात आली आहे.

काय होती ट्रॅव्हल अॅडव्हायझरी?

युकेमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर १० दिवसांसाठी क्वारंटाइन होणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी आणि भारतात आल्यानंतर आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट करावी लागणार होती.

loading image
go to top