धक्कादायक ! पुढील एका वर्षात सर्वाधिक बालकांचा मृत्यू भारतात होण्याची शक्यता

वृत्तसंस्था
Friday, 26 June 2020

पुढील एका वर्षात दक्षिण आशियामध्ये ८ लाख ८० हजार मुलांचा होणार मृत्यू असल्याचा धक्कादायक अहवाल, युनिसेफ या संस्थेने दिला आहे.

नवी दिल्ली : पुढील एका वर्षात दक्षिण आशियामध्ये ८ लाख ८० हजार मुलांचा होणार मृत्यू असल्याचा धक्कादायक अहवाल, युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने दिला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू भारतात होण्याची शक्यताही त्याच्याकडून वर्तविण्यात आली असून युनिसेफच्या अहवालात १२ कोटी मुलांसमोर गरीबीचे संकट असल्याचेही म्हटले आहे. सोबतच, ३६ हजार मातांचा मृत्यू होण्याची शक्यताही या अहवालात वर्तविण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारताबरोबरच दक्षिण आशियामधील देशांमध्ये राहणाऱ्या लहानमुलांसंदर्भात बालकल्याण आणि मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ या संस्थेने हा अहवाल दिला आहे. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार असं झाल्यास दक्षिण आशियामध्ये गरीब मुलांची संख्या ३६ कोटींपर्यंत जाईल. युनिसेफने जारी केलेल्या अहवालामध्ये जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या एका अभ्यासाचा संदर्भ देण्यात आला आहे. हा सर्व परिणाम सध्या सुरु असलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अहवाल काय सांगतो?
दक्षिण आशियामध्ये खास करुन भारत आणि पाकिस्तानमध्ये ५ वर्षे किंवा त्याहून कमी वयाच्या ८ लाख ८० हजार मुलांचा आणि ३६ हजार मातांचा मृत्यू होण्याची शक्यता युनिसेफने व्यक्त केली आहे. लाइव्स अपेडेंड हाऊ कोवीड-१९ थ्रेट्स द फ्यूचर्स ऑफ ६०० मिलियन साऊथ एशियन चिल्ड्रन या नावाने प्रकाशतील करण्यात आलेल्या अहवालामध्ये दक्षिण आशियामधील परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या देशांमधील परिस्थितीबद्दल या अहवालात सांगण्यात आलेले आहे.
----------------
...तर स्टॅच्यू ऑफ युनिटी हटवायला पाहिजे; 'या' नेत्याने केली मागणी
----------------
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांसोबत चकमक; एक दहशतवादी ठार
----------------
दक्षिण आशियामधील २४ कोटी मुलं आधीच गरीबीच्या समस्येला तोंड देत आहेत. यामध्ये आरोग्यव्यवस्थेची कमतरता, शिक्षण घेताना येणारे अडथळे, अस्वच्छता तसेच एकंदरित जीवनाचे खालावलेली गुणवत्ता अशा समस्यांचा समावेश आहे. या असा संकाटांचा समाना करणाऱ्या मुलांच्या संख्येत करोना संकटामुळे वाढ होणार असून आणखीन १२ कोटी मुलांना गरीबीमुळे उद्भवणाऱ्या या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे असं या अहवालात म्हटलं आहे. करोनामुळे या प्रदेशामधील मुलांना मिळाणारे पोषक अन्न, लसीकरण आणि इतर महत्वपूर्ण आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वात वाईट परिस्थितीमध्ये दक्षिण आशियामध्ये पुढील वर्षभराच्या कालावधीमध्ये पाच वर्ष किंवा त्याहून कमी वयाच्या ८ लाख ८० हजार मुलांचा तसेच ३६ हजार मातांचा मृत्यू होऊ शकतो. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे भारत आणि पाकिस्तानमध्ये होतील. बांगलादेश आणि अफगाणिस्तानममध्ये मृत्यूदर अधिक असेल, असं या अहवालात म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: COVID-19 impact may kill 8 lakh kids in South Asia says UNICEF

Tags
टॉपिकस
Topic Tags: