कोरोनाबाबत केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स; राज्यांना दिले आदेश

pm modi
pm modi
Updated on

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नव्या गाइडलाइन्स प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये कंटेन्मेंट झोनसह इतर गोष्टींबाबत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीसाठी केंद्र सरकारने नवीन गाइडलाइन्स दिल्या आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नियमांचे कडक पालन करावं असं म्हटलं आहे. तसंच कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत त्याभागात काळजी घेऊन परिस्थिती चांगली होण्यासाठी पावले उचलावीत असं सांगण्यात आलं आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच गर्दीच्या ठिकाणी काळजी घेण्यास आणि गर्दी नियंत्रित कऱण्यास बजावलं आहे.

नवी नियमावली

  • राज्यांना सूट देण्यात आली असून परिस्थिती पाहून राज्ये निर्बंध घालू शकतात. 
  • सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या कंटेन्मेंट झोनची यादी संकेतस्थळावर अपलोड करावी लागेल. तसंच ती आरोग्य मंत्रालयाकडे द्यावी लागेल. 
  • कंटेन्मेंट झोनमध्ये काळजी घेताना लोकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालावी लागेल. फक्त अत्यावश्यक वस्तू आणि वैद्यकीय सेवेसाठी सूट मिळेल.
  • नजर ठेवणारी टीम प्रत्येक घरी जाऊन कोरोनाची लक्षणे असलेल्यांची ओळख पटवणार आहे. तसंच प्रोटोकॉलनुसार टेस्टिंग केलं जावं.
  • संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करावी. त्यांची ओळख पटवून ट्रॅक करावं आणि क्वारंटाइन करण्यात यावं. 
  • ससंर्ग झालेल्यांवर त्वरीत उपचार सुरू करण्यात यावेत. त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावं. गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करावं. 
  • ILI आणि SARI केसेस असतील तर मोबाइल युनिट त्यांच्या संपर्कात राहील अशी व्यवस्था करावी. 
  • निर्बंध लागू करण्यासाठी आणि नियमांचे पालन करण्यासाठी स्थानिक जिल्हा प्रशासन आणि पोलिस जबाबदार असतील.

केंद्राच्या गाइडलाइन्सनुसार, कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सुविधांसाठी परवानगी दिली जाईल. तसंच हे ठरवण्यासाठी स्थानिक जिल्हा, पोलिस आणि नगरपालिकेचे अधिकारी काम करतील. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे पालन करावे लागेल. राज्य आणि केंद्र शासित प्रदेश संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com