esakal | 90 टक्के प्रभावी असणाऱ्या लसीचं उत्पादन करणार सीरम
sakal

बोलून बातमी शोधा

90 टक्के प्रभावी असणाऱ्या लसीचं उत्पादन करणार सीरम

90 टक्के प्रभावी असणाऱ्या लसीचं उत्पादन करणार सीरम

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अमेरिकेतील Novavax कोरोना विरोधात प्रभावी असल्याचं सोमवारी स्पष्ट झालं होतं. Novavax लस तिन्हीही क्लिनीकल ट्रायलमध्ये 90 टक्के यशस्वी झाली आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंयटवरदेखील Novavax लस प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. जगभरात कोरोना लसीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. Novavax या लसीची निर्मिती भारतामध्ये होणार असल्याचं समोर आलं आहे. यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यासोबत बोलणी सुरु आहेत. अनेक विकासशील देशात लसीकरणासाठी Novavax महत्वाची भूमिका बजावू शकते, असं अमेरिकेतील तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

भारतात लसीकरण निर्मिती करणारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया Novavax या लसीचीही निर्मिती करणार आहे. Novavax च्या आधिकाऱ्यानं सांगितलं की, सप्टेंबरच्या अखेरपर्यंत अमेरिका, यूरोप आणि अन्य ठिकाणी लसी वापरण्याची मंजूरी मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरु आहेत. महिन्याला 10 कोटी लसी डोस तयार करण्याची सध्या आमची क्षमता आहे. Novavax चे मुख्य कार्यअध्यक्ष स्टेनली एर्क यांनी सांगितलं की, 'या दोन शॉटच्या लसीला 2 ते 8 डीग्री सेल्सियलच्या दरम्यान ठेवण्याची गरज असते. यामुळे लसीला स्टोअर करणे तसेच त्याची वाहतुक करणं सोपं होणार आहे. खासकरुन विकसनशील देशांमध्ये लसीचा पुरवठा वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भुमिका निभावण्याची आशा आहे. सुरुवातीला आम्ही लसीचे डोस गरीब आणि अति गरीब देशांमध्ये पाठवणार आहोत.'

हेही वाचा: आता Paytm वर बुक करा लस; जाणून घ्या प्रक्रिया

दरम्यान, Novavax या लसीचं कोडनेम NVX-COV2373 आहे. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी Novavax जवळपास 90 टक्के प्रभावी असून मध्यम ते गंभीर संक्रमणाला रोखण्यासाठी 100 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेयर्डनेस इनोव्हेशन (CIPI) सोबत एकत्र येत विकसित केलेल्या या लसीने व्हेरियंट ऑफ कन्सर्न आणि व्हेरियंट ऑफ इंटरेस्टच्या विरोधात देखील 93 टक्के परिणामकारकता दाखवली आहे. या लसीचे अधिक जोखिम असलेल्यांमध्ये देखील प्रभावीपणा दाखवला आहे. यामध्ये 65 वर्षांहून अधिक वयाचे तसेच त्यापेक्षा कमी वयाचे मात्र सहव्याधी असणाऱ्यांवर या लसीची ट्रायल घेण्यात आली होती.

loading image
go to top