Covid-19 : भारतात लोक खरंच सुरक्षित आहेत का? कोविड वर्किंग ग्रुपच्या प्रमुखांचा मोठा खुलासा

corona in india
corona in indiaesakal

नवी दिल्लीः चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहाःकार माजवला आहे. चीनकडून रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा लपविला जात असल्याचा संशय इतर देशांना आहे. या सगळ्या पातळीवर भारत किती सुरक्षित आहे, हा प्रश्न पडतोय.

यासंदर्भात कोविड टीमच्या एक्स्पर्टने महत्त्वाची माहिती दिलीय. कोविड वर्किंग ग्रुप NTAGI चे प्रमुख एन.के. अरोरा यांनी सांगितलं की, सध्या तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. असं असलं तरी चीनच्या परिस्थितीवर नजर ठेवावी लागेल. भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्याचं कारण व्हॅक्सिनेशन. देशात जवळपास सर्व ज्येष्ठांचं लसीकरण झालेलं आहे.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच हिमाचलच्या १४व्या विधानसभेचं पहिलं सत्र रद्द करण्यात आलेलं असल्याचं अरोरा यांनी सांगितलं.

corona in india
Uddhav Thackeray : राजा तू चुकतोस... उद्धव ठाकरेंनी कुणाला दिली समज?

सध्या कोरिया, जपान, अमेरिका आणि चीनमध्ये वाढती कोरोनाची प्रकरणं पाहता केंद्रानं एक मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत. यासंदर्भात केंद्रानं राज्यांना एक पत्र लिहिलं असून यामध्ये जिनोम सिक्वेंसिंगसाठी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे अहवाल पाठवायला सांगितले आहेत.

आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला देखील याबाबत पत्र लिहिलं आहे. यामध्ये देखील जिनोम सिक्वेंसिंगवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com