esakal | आंंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 मेपर्यंत बंदी; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय

बोलून बातमी शोधा

आंंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 मेपर्यंत बंदी; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  घेतला निर्णय
आंंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 मेपर्यंत बंदी; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोना कहरामुळे संपूर्ण जगालाच वेठीस धरलं गेलंय. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट हाहाकार माजवत असून यामुळे मोठं संकट देशावर आलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या लॉकडाऊनची परिस्थिती असून अनेक कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवरच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आंतराराष्ट्रीय उड्डाणे येत्या 31 मेपर्यंत थांबवण्यात आले आहेत. नागरी उड्डाण संचालनालयकडून जाहीर केलेल्या आदेशामध्ये म्हटलंय की, भारतामधून जाणाऱ्या तसेच येणाऱ्या उड्डाणांवरील बंदीला 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. फक्त कार्गो फ्लाईट्ससाठी हा नियम लागू असणार नाहीये.

हेही वाचा: उद्यापासून 18 ते 45 वयोगटालीत लसीकरण नावालाच!

याशिवाय डीजीसीएकडून मंजूरी घेऊन प्रवास करणाऱ्या उड्डाणांना देखील हा निर्णय लागू असणार नाहीये. या आदेशात म्हटलं गेलंय की, डीजीसीएकडून काही मोजक्या मार्गावरील उड्डाणांना मान्यता असेल. मात्र, या उड्डाणांना देखील विचार करुनच सूट दिली जाईल तसेच प्रत्येक प्रकरणावर स्वतंत्रपणे विचार केला जाईल. भारतात साधारण गेल्या 10 दिवसांपासून दररोज सुमारे 3 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. नागरी उड्डाण संचालनालयकडून जाहीर करण्यात आलेल्या आदेशात म्हटलं गेलंय की, ऑथॉरिटीने इंटरनॅशनल कमर्शियल पॅसेजर्स फ्लाईटवर बंदीचे आदेश 31 मे 2021 पर्यंत वाढवले आहेत. मात्र, ही बंदी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रायी कार्गो फ्लाईट्सच्या ऑपरेशन्सवर लागू असणार नाहीये.