Adar Poonawala
Adar Poonawalae sakal

Covid-19 Vaccine : कोरोनाच्या लसी घ्यायचा लोकांना आणि मलासुद्धा कंटाळा आलाय - अदर पूनावाला

अदर पूनावाला हे कोविशिल्ड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आहेत.
Published on

कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रमुख उत्पादकांपैकी एक असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक चिंता व्यक्त केली आहे. आपण डिसेंबर २०२१ पासूनच लसीचं उत्पादन थांबवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय जवळपास १०० मिलियन डोस एक्स्पायर झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पूनावाला लस उत्पादक देशांच्या वार्षिक सभेनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितलं की, बुस्टर डोसला सध्या मागणी नाही. लोकांमध्ये आता थोडा आळशीपणा आला आहे आणि लोक कोरोना महामारीला आता कंटाळले आहेत. पूनावाला पुढे म्हणाले की, डिसेंबर २०२१ पासून आम्ही कोविशिल्डचं उत्पादन थांबवलं आहे. त्यावेळी आमच्याकडे १०० मिलियन डोस होते. मात्र ते एक्स्पायर झाले आहेत.

अदर पूनावाला पुढे म्हणाले, "आता कोवोवॅक्सला येत्या दोन आठवड्यांमध्ये परवानगी द्यायला हवी. मला वाटलं ते देतील आणि बुस्टर डोस एकत्र द्यायचं धोरणही स्विकारतील. जर जागतिक आरोग्य संघटनेने परवानगी दिली तर भारतातही परवानगी मिळेल. पण पुन्हा सध्या बुस्टर डोसला मागणी नाहीये. लोकांना आता लस घ्यायचा कंटाळा आलाय. खरं सांगायचं तर मीही कंटाळलोय, आपण सगळेच कंटाळलो आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com