esakal | दिल्लीतील मैदाने होणार कोविड रूग्णालये; रामलिला मैदानावर १ हजार खाटांचे सेंटर

बोलून बातमी शोधा

दिल्लीतील मैदाने होणार कोविड रूग्णालये; रामलिला मैदानावर १ हजार खाटांचे सेंटर
दिल्लीतील मैदाने होणार कोविड रूग्णालये; रामलिला मैदानावर १ हजार खाटांचे सेंटर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना रुग्णसंख्याचा स्फोट झाल्यामुळे देशाच्या राजधानीतील एकूणच सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये जागाच उरलेली नाही, त्यामुळे दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने आणीबाणीच्या परिस्थितीत ऐतिहासिक रामलीला मैदानाचेच रूपांतर रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये रुग्णालयांमध्ये करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की रामलीला मैदानावर १००० खाटांचे उभारण्यात उभारण्यात येईल आणि ५ मेपासून याचे कामकाज सुरू होईल.

लोकनायक जयप्रकाश नारायण रूग्णालयाच्या बरोबर समोर असणाऱ्या या या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पाचशे खाटांचा अतिदक्षता विभाग खाटांचा व सर्वसामान्य उपचार कक्ष असे दोन भाग असतील.

दिल्लीत दररोज २० हजाराच्या वर नवे रुग्ण आढळल्याचा आजचा सलग सहावा दिवस होता. मागच्या चोवीस तासांमध्ये ३८० हून जास्त कोरोना रुग्णांनी प्राण सोडले. सर्व रुग्णालयांमधील परिस्थिती अत्यंत गंभीर व भीषण असून नवीन व्यवस्था केल्याशिवाय दिल्लीतील परिस्थिती हाताळणे अशक्य आहे हे लक्षात घेऊन राज्य सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था आता तात्पुरत्या कोविड रुग्णालयांच्या उभारणीला लागले आहेत. यामुळे रुग्णालये आणि ऑक्सिजनसाठी वणवण फिरणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांना किंचित दिलासा मिळण्याची अंधूक आशा आहे. यामागील ४-५ दिवसांमध्ये आपण अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व अनेक उद्योजकांनाही पत्र लिहून ऑक्सिजन सिलिंडरची मदत दिल्लीला करण्याबाबत विनंती केली आणि आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला असे सांगून केजरीवाल म्हणाले, की रुग्णालय असल्याने आणि रुग्ण संख्या रोज वाढत चालल्याने त्याचे रूपांतर रुग्णालयांमध्ये करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. रामलिला मैदानाचे दोन भाग करून तेथे ५००-५०० खाटांची उपचार केंद्रे सुरू करण्यात येतील.

हेही वाचा: देशावर संकट येताच बड्या उद्योगपतींनी धरली परदेशाची वाट

चाचण्या आणि लसीकरण मंदावले

दिल्लीत गेल्या पंधरा दिवसात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झालेला आहे आणि याच काळात कोरोना चाचण्या आणि लसीकरण यांचा वेग मात्र प्रचंड मंदावला आहे असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अधिकाधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडणे म्हणजेच पॉझिटिव्हिटी दर ३५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढणे हाही सरकारच्या काळजीचा विषय ठरू शकतो. केजरीवाल यांनी सर्वप्रथम लॉकडाउनची घोषणा केली त्या दिवशी म्हणजे २६ एप्रिल ला केवळ ४३ हजार ४३७ जणांना लसीकरण करण्यात आले होते. त्यादिवशी चाचण्यांची संख्या ५७ हजार ६९० इतकी होती. मात्र त्याआधीच्या पंधरवड्यात म्हणजे ११ एप्रिलला हेच आकडे अनुक्रमे एक लाख ५ हजार आणि एक लाख १४ हजार इतके होते. त्यानंतर रुग्णांचा महापूर वाहू लागल्याने रुग्णालयात आणि वैद्यकीय यंत्रणांचे चाचणी आणि लसीकरणाकडे दुर्लक्ष होत गेले आणि त्याचा भीषण फटका दिल्लीला बसला असे आढळले आहे. अधिकाधिक चाचण्या आणि वेगवान लसीकरण हा कोरोना संक्रमण रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे या वास्तवाच्या बरोबर उलटी गंगा दिल्लीत वाहत आहे हे वस्तुस्थिती सरकारच्या सूत्रांनीही मान्य केली आहे.