
नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाप्रमाणेच प्रसार होणाऱ्या एचएमपीव्ही (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) विषाणुमुळे जगावर पुन्हा एकदा काळजीचे सावट निर्माण झालेले असताना भारतात या विषाणुने प्रवेश केला आहे. देशात या विषाणुचे पाच रुग्ण आढळले असून यात कर्नाटक व तमिळनाडूतील प्रत्येकी दोन तर गुजरातेतील एका रुग्णाचा समावेश आहे.