Big Breaking: 18 वर्षांवरील सर्वांना देणार कोरोना लस

देशात कोरोना रुग्ण वाढीचा वेग धडकी भरवणार आहे. त्यामुळं कोरोनाची ही दुसरी लाट रोखण्याचं आव्हान सध्या भारतापुढं आहे.
covid vaccination
covid vaccinationChristian Emmer
Updated on
Summary

देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्यानं चिंतेचं वातावरण आहे.

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अडीच लाखांच्या पुढे आढळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव प्रभावी पर्याय असल्याचं तज्ज्ञां मत आहे. त्यामुळे देशातील सर्वांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. यावर केंद्र सरकारने मोठा निर्यण घेतला असून 18 वर्ष वयांपुढील सर्व व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 45 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत होती. 1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांना कोरोनावरील लस मिळेल. कोरोनावर मात करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं म्हटलं जातंय.

covid vaccination
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण
covid vaccination
इस्त्रायल झाला मास्क फ्री; ठरला जगातील पहिला देश

लशीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फक्त फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात येत होती. त्यानंतर लशीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात वय वर्षे 60 च्यावरील तसेच वय वर्षे 45 च्या वरील सहव्याधी असणाऱ्या लोकांच्या लशीकरणास सुरवात करण्यात आली होती. दरम्यान, लशीच्या निर्यातीपेक्षा भारतातील सर्वांचं लशीकरण करावं, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे करण्यात येत होती. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदींना आवाहन केलं होतं की, सर्वांना लस देण्यात यावी. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 25 वर्षे वयावरील सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

covid vaccination
कोरोनावर भारतीय औषध! AAYUDH Advance ठरतंय प्रभावी; ट्रायल यशस्वी

देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर 60 वर्षांपुढील आणि असाध्य आजाराने बाधित असणाऱ्या लोकांना लस देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपुढील लोकांना लस देण्यात येत होती. असे असेल तरी कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे सर्व व्यक्तींना लस देण्यात यावी अशी मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होण्याची आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com