
कोरोनाच्या महासाथीनंतर देशात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर देशात गेल्या तीन ते चार वर्षात हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात तरुणांची संख्या लक्षणीय असल्यानं कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आता यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की, कोरोना लस आणि हृदयविकाराने होणारे मृत्यू याचा काही संबंध नाही. आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या संशोधनाचा अहवाल मिळाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.