
सीरमने तयार केलेल्या कोवोव्हॅक्स लशीच्या वापरासाठी डीजीसीआयकडे परवानगी मागण्यात आली होती.
१२ ते १७ वयोगटाला COVOVAX च्या वापरासाठी केंद्राच्या समितीची शिफारस
नवी दिल्ली - सेंट्रल ड्रग्ज अथॉरिटीच्या तज्ज्ञ समितीने देशात भारतीय बनावटीच्या कोवोव्हॅक्स या लशीचा आपत्कालीन वापर १२ ते १७ वयोगटात करण्यासाठी शिफारस केली आहे. कोवोव्हॅक्स लस सीरम इन्स्टिट्यूटने तयार केली असून त्याच्या वापरासाठी DCGIकडे शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रकाश कुमार सिंह यांनी DCGI कडे २१ फेब्रुवारी रोजी परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यामध्ये १२ ते १७ वयोगटातील मुलांसाठी कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. सीडीएससीओच्या कोरोनावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने शुक्रवारी सीरमच्या अर्जावर बैठक घेतली. यानंतर कोवोव्हॅक्सच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरीसाठी शिफारस केली आहे. आता या मंजुरीसाठी डीसीजीआय़कडे शिफारस पाठवण्यात येईल.
कोव्होवॅक्सला मंजुरी मिळाल्यास याचा फक्त देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फायदा होईल. यामुळे पंतप्रधान मोदींचे मेकिंग इन इंडिया फॉर वर्ल्ड हे व्हिजन पूर्ण होईल असं आदर पूनावाला यांनी याआधी म्हटलं होतं.
डीजीसीआयने याआधी २८ डिसेंबर रोजी वृद्धांना आपत्कालनी परिस्थितीत मर्यादीत वापरासाठी कोव्होवॅक्सला परवानगी दिली होती. अद्याप देशाच्या लसीकऱण मोहिमेमध्ये या लशीचा समावेश नाही. युरोपियन मेडिसिन एजन्सीने लसीला याआधी मंजुरी दिली होती. तसंच जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा आपत्कालीन वापराच्या यादीत याचा समावेश केला होता. सध्या भारतात १५ ते १८ वयोगटासाठी कोव्हॅक्सिन ही लस दिली जाते.
Web Title: Covovax For 12 17 Age Group Govt Panel Recommends Granting Emergency Approval
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..