गाईने लहान मुलाला तुड-तुड तुडवलं हो...

वृत्तसंस्था
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

एका पिसाळलेल्या गाईने मुलाला अक्षरश तुड-तुड तुडवले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंदीगड (पंजाब): एका पिसाळलेल्या गाईने मुलाला अक्षरश तुड-तुड तुडवले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पंजाबच्या मुक्तसर या गावामध्ये ही घटना घडली आहे. गावात मोकाट फिरणाऱ्या एका पिसाळलेल्या गाईने लहान मुलावर हल्ला केला. गाईने मुलाला अक्षरश तुडवल्याचे दिड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मुलाला वाचवण्यासाठी गावातील नागिरक प्रयत्न करताना दिसतात. पण, गाय मुलाला शिंगानेगी मारहाण करताना दिसत आहे. शेवटी, गावकऱ्यांनी गाईला दगड मारून, काठीने हुसकावून लावले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गाईला काठी आणि दगड मारल्यानंतर पळून गेली. त्यानंतर मुलगा उठून उभा राहिल्याचे दिसत आहे. परंतु, मुलाला किती दुखापत झाली याबाबतची माहिती मिळू शकली नाही. संबंधित व्हिडिओ पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow attack on boy at punjab cctv footage viral