Cow Hug Day : 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करा'; केंद्राचे देशवासियांना आवाहन

याबाबत AWBA एक पत्र जारी केले आहे.
Cow Hug Day
Cow Hug DaySakal

Cow Hug Day : संपूर्ण जगभरात १४ फेब्रुवारी रोजी 'व्हॅलेंटाईन डे' साजरा केला जाणार आहे. या दिवसासाठी बाजार पेठा सजण्यास सुरूवात झाली आहे.

मात्र, त्याआधी पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, असे आवाहान प्राणी कल्याण मंडळाने केले आहे.

Cow Hug Day
QR Code Vending Machine : RBI ची क्यूआर कोड कॉईन व्हेंडिंग मशीन कशी काम करणार

पत्रात नेमकं काय?

AWBA जारी केलेल्या पत्रात लिहिले आहे की, आपल्या सर्वांना माहित आहे की गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटाने आपली संस्कृती आणि वारसा विसरला आहे.

गायीला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करावा. तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा असे AWBA ने पत्रात म्हटले आहे.

Cow Hug Day
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर

गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ती जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. मानवतेला सर्वस्व देणार्‍या मातेप्रमाणे पोषण देणार्‍या स्वभावामुळे ती कामधेनू आणि गौमाता म्हणून ओळखली जाते असे AWBA ने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com