गाय पाळणाऱ्या नेत्यालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार द्या; कॅबिनेट मंत्र्याची अजब मागणी I MP Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardeep Singh Dang

'गायीचं पालन करणाऱ्या नेत्यालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळायला हवा.'

'गाय पाळणाऱ्या नेत्यालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार द्या'

मध्य प्रदेश : गायीचं (Cow) पालन करणाऱ्या नेत्यालाच निवडणूक लढवण्याचा अधिकार मिळायला हवा, असं मत मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री हरदीप सिंह डंग (Hardeep Singh Dang) यांनी व्यक्त केलंय. उज्जैन विभागामधील मंदसौर जिल्ह्यातील (Mandsaur District) सीतामऊ इथं आयोजित हंडियाबाग गोशाळेतील भागवत कथेला उपस्थित राहण्यासाठी डंग आले होते. त्यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.

मध्य प्रदेश सरकारमधील (Madhya Pradesh Government) कॅबिनेट मंत्री आणि सुवासरा विधानसभेचे (Suwasra Assembly) आमदार हरदीप सिंह डंग म्हणाले, मी विधानसभेत ही मागणी केलीय. जर शेतकरी गाय पाळत नसेल तर त्याच्या शेताची खरेदी-विक्रीची नोंदणी रद्द करण्यात यावी. तसेच सरपंच, आमदार, खासदार या पदांसाठी जो गाय पाळेल, त्यालाच तिकीट द्यावं आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार द्यावा, अन्यथा त्यांचा फॉर्म रद्द करावा, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा

याआधी भंडारेमध्ये मंत्री डंग यांनी हजेरी लावली होती. यावेळी मंत्र्यानं स्वत:च्या हातानं भाविकांना जेवणही वाढलं होतं. त्यानंतर त्यांनी स्वतः प्रसाद घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गौतम सिंह, पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Cow Raising Leader Should Get Right To Contest Election Hardeep Singh Dang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Madhya PradeshCow
go to top