
'भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाहीय.'
भोंग्यांबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांचा राज ठाकरेंना इशारा
नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काल पुन्हा एकदा हल्लाबोल केला. शरद पवार यांच्यासाठी खास काही वेगळे संदर्भ आणले आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. तसेच शरद पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं, असा टोला लगावला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना नास्तिक म्हटल्यानं त्यांना बोचलं असं म्हणत सुप्रिया सुळेंचा संदर्भ दिला. ते काल रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते. या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
नाशिकमधील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, राज ठाकरेंनी काल पूर्वीचंच भाषण रिपीट केलंय. भोंग्याबाबत कोणतीही हुकूमशाही चालणार नाहीय. राज्य घटना, कायदे, नियम सर्वांना सारखे आहेत. त्यामुळं घरी बसून आणि सभेत बोलायला काय जातं? कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस कारवाई करतील, असा थेट इशारा अजित पवारांनी राज यांना दिलाय.
हेही वाचा: राष्ट्रवादीच्या बाजारबुणग्यांमुळं सहकार उद्ध्वस्त : आमदार शिंदे
ते पुढं म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं काम महात्मा फुलेंनी केलंय, त्यामुळं इतिहास नीट अभ्यासला जावा, असा सल्लाही त्यांनी राज यांना दिलाय. राज यांनी उन्हाचा तडाखा, भारनियमन, महागाई, कोळशाचा तुटवडा या प्रश्नांबद्दल बोलावं, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'
शरद पवारांना काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार सांगतात आम्ही दोन समाजात दुही माजवत आहोत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत, त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायची. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग, त्यांचे मंदिरांमधील फोटो यायला लागले.'
Web Title: Ajit Pawar Criticism Of Raj Thackeray At Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..