गोहत्येप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा

महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 एप्रिल 2017

अहमदाबाद : गुजरातमध्ये गोहत्येचा पहिलाच गुन्हा आढळला असून या प्रकरणी आरोपीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युसुफ रेहमान वेपारी (वय 65) असे या व्यक्तीचे नाव असून तो उत्तर गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात अवैधरीत्या गोहत्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

युसूफ हे अवैधपणे गोहत्या करत होते, तसेच त्यांच्याकडे तीन गाईदेखील होत्या. न्यायदंडाधिकारी जे. जे. जाधव यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली या वेळी त्यांनी गाय ही महत्त्वाचा घटक असल्याचे सांगत त्यांना शिक्षा सुनावली. दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून 300 किलो वजनाचे गोमांसही जप्त केल्याची माहिती या वेळी दिली.

Web Title: cow slaughter sentence of three years